अनोळखी तरुणाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला
सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंद;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन
परळी / प्रतिनिधी
तालुक्यातील सिरसाळा-बीड रस्त्यावरील वांगी शिवारात तलाव लगत अनोळखी तरूणाच गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
नानकराम माहन्या रावत (वय 27 वर्ष ) रा.घोडीबुजुला मध्यप्रदेश हल्ली मु. सिरसाळा याने सिरसाळा-बीड रस्त्यावरील वांगी शिवारात तलावाच्या काठावर पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती सिरसाळा पोलीसांना ( दि. १ डिसेंबर ) बुधवारी ४:२२ वाजण्याच्या सुमारास दिली. माहिती मिळताच सिरसाळा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अंदाजे ३५ ते ४० वयाचा अनोळखी तरुण पालथा मृत अवस्थेत पडलेलं दिसून आला. त्याचा गळा चिरून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पाय बांधून मृतदेह तलावात फेकण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या अंगावर पोपटी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, काळी फॉर्मल पॅंट, पायात काळा बुट, डाव्या हाताला मनगटाजवळ भाजलेलं जुने वर्ण, डाव्या पायात व गळ्यात काळा दोरा,पॅंटीच्या खिशावर आतून संतोष नाव असून, रंग सावळा उंची १६० से.मी. केस मजबूत काळे, दाढी वाढलेली. असे वर्णन असून ओळख पटविण्यासाठी मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आले आहे. याबाबतीत कोणाला काही माहिती अथवा ओळखत असेलतर 9850143720 , 7875212521 , 7720996150 , 02446262433 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात ३०२ कलमानुसार सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पी . बी . एकशिंगे करीत आहेत.