क्राईम
अज्ञात वाहनाने चिरडले एकजण जागीच ठार
लोकगर्जनान्यूज
बीड : अज्ञात वाहनाने चिरडून गेल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. २३ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेकनूर-मांजरसुंबा रस्त्यावर रत्नागिरी पाटीजवळ घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शरद भारत मेंगडे ( वय २५ वर्ष ) रा. सफेपूर ( ता. बीड ) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. शरद यास चार चाकी अज्ञात वाहनाने चिरडून पसार झाला. चाक डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा झाला आहे. रक्तात भरलेले चाकाच्या नकशीवरुन धडक देणारे वाहन चारचाकी असावं असा पोलीसांचा अंदाज आहे. माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर कुटीर रुग्णालयात हलविले आहे.