अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट ठार:आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील घटना

लोकगर्जना न्यूज
आडस : अंबाजोगाई रस्त्यावर उमराई जवळ एक काळवीट रस्त्याच्या कडेला आज दुपारी मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई वण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृत काळवीट अंत्यविधी केला. या रस्त्यावर हरणांची संख्या वाढल्याने वाहन धारकांच्या व हरणांच्या जीविताला धोका वाढला असून नेहमीच हरणांनाचे अपघात घडत आहेत. हरणांची धडक लागून काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
रस्ता ओलांडताना हरीण, काळवीट हे बंदुकीच्या गोळी प्रमाणे धावत येतात. ते अचानक समोर आल्याने वाहन चालकाचा नाविलाज होऊन धडक बसून हरणाची जिवितहानी होत आहे. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तसेच हरणाची धडक बसून काही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. आज शनिवारी दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडताना काळवीटाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत काळवीट जागीच ठार झाला. रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत काळवीट पाहून काही नागरिकांनी वण विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून काळवीट ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.