राजकारण
अजित रांजणकर स्वा.शे. संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड
![अजित रांजणकर स्वा.शे. संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड अजित रांजणकर स्वा.शे. संघटनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड](https://i0.wp.com/lokgarjananews.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230331_125804.jpg?resize=780%2C470&ssl=1)
केज : तालुक्यातील युसुफवडगावचे येथील अजित रांजनकर यांची नुकतीच तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शासकीय विश्रामगृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते केज तालुकाध्यक्ष पदी अजित रांजनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अंबाजोगाई विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर,महादेव वाघमारे,राजु गायके,अशोक गित्ते,लहु गायकवाड व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने अजित रांजनकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.