अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावर दावा; मोठ्या पवारांच्या प्रतिक्रियेकडे राज्याचं लक्ष
लोकगर्जनान्यूज
आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सामील झालो असून, येत्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी पक्ष म्हणून घड्याळ या चिन्हावर लढवणार असल्याचे सांगत पत्रकार परिषदेत पक्षावर दावा केला. यानंतर शरद पवार यांचीही पत्रकार परिषद होणार असल्याने ते काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून सत्तेत सामील झाले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांत तिसऱ्यांदा शपथ घेतली. तसेच छगन भुजबळ, धनंजय मुंडे सह आदि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांचा व नेत्यांचा आशिर्वाद असल्याचे सांगितले. आणि सर्व म्हणजे सर्वच असेही म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही शिंदे गट, भाजपाच्या सरकार मध्ये सामील झाल्याचे सांगितले. तसेच येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या चिन्हावर लढवणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सह चिन्हावर दावा केला. यामुळे पुन्हा शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचेही दोन वेगवेगळे गट होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यानंतर शरद पवार हेही पत्रकार परिषद घेणार असल्याने ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.