अजित दादा ३३रुपयात दोन वेळेचे दर्जेदार जेवण कसे मिळेल?
हंगामी वसतिगृहातील जेवणाचे दर पुर्वी प्रमाणेच ठेवण्याची शालेय व्यवस्थापन समितीची मागणी
केज : ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत हंगामी वसतिगृह हा महत्वपुर्ण उपक्रम राबविला जातो.बीड हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो, दिवाळी नंतर ऊसतोड कामगारांचे मोठया प्रमाणात स्थलांतर होते.त्यांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात हंगामी वसतिगृह नोव्हेंबर ते मार्च पर्यंत चालवले जातात.
दादा आपली राज्याचे संवेदनशील नेतृत्व म्हणुन ओळख आहे हंगामी वसतिगृह शालेय व्यवस्थापन समिती चालवतात.विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण व आडवड्यातून एखदा गोड पदार्थ दिला जातो.आता पर्यंत प्रति विद्यार्थी दररोज ४७रुपये निधीची तरतूद करण्यात येत होती.यावर्षी शासनाने प्रति विद्यार्थी ३३रुपये निधीची तरतूद केली आहे.
३३रूपात दोन वेळेसच दर्जेदार जेवण व आडवड्यातून एखदा गोड पदार्थ कसा देता येईल,पुर्वी प्रमाणे दर केले नाहीत तर पुढच्या शैक्षणिक वर्षात शालेय व्यवस्थापण समिती हंगामी वसतिगृह चालवणार नाहीत ,पर्यायाने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर होईल व ते मुले शाळा बाह्य होतील तो धोका टाळण्यासाठी दादा आपण निर्णय घेणे महत्वाचे आहे.
गतवर्षी पेक्षा महागाई वाढलेली असतांना दर वाढवण्या ऐवजी शासनाने दर कमी केले.दादा आपण दर पुर्ववत करावेत अशी मागणी बीड जिल्ह्यातील शालेय व्यवस्थापण समितीचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक, पालक व ऊसतोड कामगारांनी केली आहे.