अखेर मुहूर्त ठरला! उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार?
लोकगर्जना न्यूज
राज्यातील शिंदे – फडणवीस दोन मंत्र्यांच सरकार राज्याचा कारभार महिनाभरापासून हाकत आहे. यावर विरोधकांकडून टिका केली जात असून, विविध खात्यांना मंत्रीच नसल्याने जनतेची कामे खोळंबली असल्याने रोष निर्माण होत आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर गेले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होऊन उद्या शपथ विधी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ परिसरात हलचाली वाढलेल्या दिसत असल्याचे वृत्त आहे.
राज्यातील सत्ता बदलून नवीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. नवीन सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. पण मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला आहे. यामुळे दोन मंत्रीच राज्याचा कारभार हाकत आहेत. मंत्रीमंडळ विस्तारासाठी कोर्टा प्रमाणे तारीख पे तारीख देत आहेत. यामुळे विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. तसेच मंत्री व पालकमंत्र्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. याचा परिणाम जनतेच्या कामांवर होत आहे. अनेकांची कामे खोळंबली असल्याने जनतेत रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. कालच दिल्ली येथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर भेटीसाठी गेले आहेत. दिल्ली कडून मंत्रीमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, आज मंत्र्यांची यादी फायनल होऊन उद्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, यावेळी १६ अथवा १७ मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, विधिमंडळ परिसरात पोलीस बंदोबस्त ही वाढविण्यात आला आहे. हे सर्व तयारी पहाता मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी उद्या पर्यंत वाट पहावी लागणार असून, पुन्हा ऐनवेळी काय होणार? याचीही जनतेला उत्सुकता आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत.