क्राईम
अखेर तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल द्वारकादास मंत्री बँक प्रकरण
बीड : येथील द्वारकादास मंञी नागरी सहकारी बॅंक वरील नियुक्त प्रशासकाच्या फिर्यादीवरुन आज दुपारी तत्कालीन संचालक मंडळावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले.
मंञी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरण बॅंकेचे संस्थापक सुभाष सारडांसह संचालक मंडळाला चांगलेच भवले आहे. हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आहे. या बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे. या प्रशासकाच्या फिर्यादीवरून सुभाष सारडांसह २३ संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, चार शाखा अधिकारी असे २८ जणांवर आज दुपारी गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्यामूळे गुन्हा नोंद होण्यास विलंब होत असल्याची अशी चर्चा होती परंतु अखेर गुन्हा दाखल झाला.