अखेर ठरल; नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून
लोकगर्जना न्यूज
सत्तांतर झाल्यानंतर नगराध्यक्ष व सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार? अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा खरी ठरली असून मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत नगराध्यक्ष व सरपंच जनतेतून निवडण्याचा तसेच पेट्रोल ५ व डिझेल ३ रु. कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युती शासनाने नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. मागील अनेक निवड जनतेतून झाली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय बदलून पुन्हा नगराध्यक्ष व सरपंच सदस्यांमधून निवडण्याचा निर्णय घेत थेट निवडीचा निर्णय बदलण्यात आलं. मात्र पुन्हा राज्यात सत्तांतर झाले व शिवसेना बंडखोर व भाजपाचे सरकार सत्तेवर आले. सत्तांतरानंतर पुन्हा नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून होणार अशी चर्चा सुरू झाली. याला बावनकुळे यांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालु असे विधान केले. त्यामुळे अनेकजण हा निर्णय होणार की, नाही म्हणून डोळे लावून बसले होते. अखेर नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवडीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच इंधनाच्या करात कपात करण्यात आली. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रु. दराने स्वस्त होणार. बाजार समिती निवडणुकीत सरसकट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार यासह आदी म्हत्वाचे निर्णय घेण्यात आले. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.