अखेर आसोला येथे शासकीय टॅंकर पोहचले तोफा,बॅंड वाजवून केली ग्रामस्थांनी पुजा
किल्ले धारूर : प्रतिवर्षी पेक्षा या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झालेले होते यामुळे जास्त ठिकाणी पाणी टंचाई जाणवली नाही.परंतू पाणी टंचाई आसोला गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
गावात पाणी पुरवठ्यावर लाखोंच्या योजना झाल्या आहेत पण पाणी प्रश्न कायमचा सुटलेला नाही.गावाशेजारील ३५ फुट खोल विहीर आटली.वाटी वाटी पाण्यासाठी ३५ फुट खोल विहीरीत उतरून मुले बाळींना पाणी भरावे लागत होते.मात्र ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे शासकीय कागदोपत्री पाणी टंचाई दिसत नव्हती.याच गावच्या नागरीक असलेल्या जिल्हा परिषद सदस्या सौ.सुलोचना वाव्हळ यांना पण याची जाणीव नव्हती.
मात्र गावातील ॲड.संजय चोले व इतर कर्तव्य दक्ष नागरीकांनी प्रसिध्दी माध्यमांच्याद्वारे हा प्रश्न चव्हाटयावर आनला.
बामती प्रसिध्द होताच धारूर तालुक्यातील उच्च शिक्षित व संवेदनशील नेतृत्व प्रा.ईश्वर मुंडे,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल यांनी आसोला गावास भेट देवून परिस्थिती समजून घेतली.
आ.प्रकाशदादा सोळंके,उपजिल्हाधिकारी,तहसिलदार,गट विकास अधिकारी,ग्रामसेवक यांचा समन्वय घडवून शासकीय पाणी पुरवठा टॅंकर लवकरात लवकर मिळवणेसाठी प्रयत्न केले.
पुर्वी विस्तार अधिकारी पदावर नौकरी केलेल्या प्रा.ईश्वर मुंडे यांना प्रशासकीय कामकाजात दिरंगाई कशी होते हा अनुभव असल्यामुळे पाणी संकट टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पासून स्व खर्च्याने आसोला गावात नियमित पाणी पुरवठा टॅंकर सुरू केले.
अखेर आज दहा दिवसानंतर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून शासकीय पाणी पुरवठा टॅंकर आसोला गावात पोहचले.
प्रा.ईश्वर मुंडे यांच्या हस्ते टॅंकर ला पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून, तोफा,बॅंड वाजवून टॅंकरची पुजा करण्यात आली.प्रा.ईश्वर मुंडे यांनी स्वत:च्या हाताने पाण्याच्या घागरी भरून दिल्या.
या वेळी आसोला ग्रामस्थ पुरूष व महीलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
उपस्थीतांनी गावकऱ्यांच्या वतीने प्रा.ईश्वर मुंडे यांचे आभार मानले.
या वेळी सरपंच डॅा.गणेश चोले.ॲड.संजय चोले,भारत मोरे,रवि चोले,श्रीकृष्ण चोले,रमेश चोले,मदन चोले,रामेश्वर चोले,सखाराम लोखंडे,सर्जेराव लोखंडे,बाबासाहेब चोले,संदर जाधव,लक्ष्मण वाव्हळ,संजय जाधव,तुकाराम चोले,सुधाकर चोले,सुधाकर मोरे यांच्यासह महिला भगीनी उपस्थीत होत्या.
प्रा.ईश्वर मुंडे यांनी तारले
संवेदनशील व सेवाभावीवृत्ती असलेल्या प्रा.ईश्वर मुंडे यांनी स्व खर्च्याने आठ दिवस पाणी पुरवठा केला म्हणून गावात शांतता व समाधान आहे.
नाही तर एखादा पाणी बळी गेला असता अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.
भास्कर चोले ग्रामस्थ,आसोला