अंबाजोगाई भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी Acb च्या जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी १ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Acb ) रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज सोमवार( दि. २६ ) घडली आहे.
मुबारक बशीर शेख रा. प्रकाश नगर लातूर, नियुक्ती उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अंबाजोगाई असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारास बर्दापूर ( ता. अंबाजोगाई ) येथील शेतजमीन गट क्रमांक ५३२,५३३ ची कायदेशीर फीस भरुन मोजणी करून घेतली. सदरील मोजणीचे हद्द कायम,नकाशे इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी अंबाजोगाई येथील भूमी कार्यालयात अर्ज केला. ही कागदपत्रे देण्यासाठी मुबारक शेख याने १ हजार रु.लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( Acb ) बीड कडे तक्रार केली. यानंतर २३ तारखेला पडताळणी करण्यात आली. आज सोमवारी ( दि. २६ ) सापळा लावण्यात आला. यावेळी कार्यालयातच लाचखोर कर्मचारी मुबारक बशीर शेख यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे अंबाजोगाई येथे खळबळ उडाली आहे. सदरील सापळा बीड Acb कार्यालयाने यशस्वी केला.