क्राईम
अंबाजोगाई बुट्टेनाथ घाटात एसटी पलटी
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथील आगाराची अंबाजोगाई-मोरफळी बस दुपारी बुट्टेनाथ घाटात पलटी झाली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे.
अंबाजोगाई येथून येल्डा मार्गे चिचखंडी,मोरफळीला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अंबाजोगाई लगत असलेल्या बुट्टेनाथ घटात पलटी झाली. यामध्ये बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात घडताच 108 क्रमांकला फोन केल्याने अंबाजोगाई येथील रुग्णवाहिका मधून जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.