अंबाजोगाई तालुक्यात ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक:एक ठार दोन गंभीर

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : कपड्यांचे दुकान बंद झाल्यानंतर गावाकडे परत जाताना ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर घडली आहे.
करण श्रीमंत शिंदे ( वय १९ वर्ष ) रा. सुगाव ( ता. अंबाजोगाई ) असे मयताचे नाव असल्याचे समजते. शनिवारी रात्री आपलं काम संपवून कपड्यांचे दुकान बंद झाल्यानंतर करण शिंदे रा. सुगाव , नामदेव चव्हाण रा. नांदगाव,व्यंकटी पवार रा. सुगाव आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान ते पोखरी-सायगाव दरम्यान ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील खाली फेकले गेले. यामध्ये किरण शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाढत्या अपघातांमुळे वाहनधारकांनात चिंतेचे वातावरण आहे.