अंबाजोगाई -केज रस्त्यावर वीजेच्या खांबाला धडकून दुचाकीस्वार ठार
लोकगर्जनान्यूज
केज : दुचाकीने गावाकडे जाताना अंधारात वीजेच्या खांबावर दुचाकी धडकून एकजण ठार झाल्याची घटना बुधवारी ( दि. ४ ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास होळ ( ता. केज ) येथे घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शंकर फकिरा धोत्रे ( वय ४० वर्ष ) रा. मागाव ( जि. यवतमाळ ) हे नांदूरघाट ( ता. केज ) येथे रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचं काम करतात. बुधवारी ( दि. ४ ) नांदूरघाट येथून यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावी दुचाकीवरून चालले होते. दरम्यान ते होळ जवळ आले असता अंधारात रस्त्याच्या कडेला असलेला वीजेचा खांबावर दुचाकी आदळली. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करत खाजगी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे घोषित केले. युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.