अंबाजोगाईत खळबळ! भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर दगडाने ठेचून खून
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा अज्ञात लोकांनी हल्ला करत एका तरुणाला दगडाने ठेचून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने अंबाजोगाई शहरासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र श्रीराम कळसे रा. महसूल कॉलणी अंबाजोगाई असे मयताचे नाव आहे. राजेंद्र याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून काही अंतरावर मोंढा रोडवर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये त्याला दगडाने ठेचून ठार केले. अचानक घडलेल्या घटनेने धावपळ उडाली. मोंढा रोडवर नेहमीच वर्दळ असते अशा ठिकाणी खूनाची घटना घडल्याने शांत असलेल्या अंबाजोगाई शहरासाठी धक्कादायक घटना असून, या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या खूनामागील कारण अद्याप समोर आले नसून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.