अंबाजोगाईकरांची अजब मागणी;सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
लोकगर्जानान्यूज
अंबाजोगाई | जिल्हा करण्याची येथील खूप जुनी मागणी आहे. पण ही मागणी काही पूर्ण होत नाही. प्रत्येकाकडून केवळ आश्वासनाची खैरात केली जात आहे. यामुळे अंबाजोगाईकरांचे जिल्ह्याचे स्वप्न साकार होत नाही. यामुळे आता सोशल मीडियावर अजबच मागणी करण्यात आली आहे. याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अंबाजोगाई जिल्ह्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. यावेळी अनेक पुढाऱ्यांनी जिल्ह्याचे आश्वासन दिले पण जिल्हा कोणीही घोषित केला नाही. जवळपास १५ वर्षांपूर्वी स्व. विमलताई मुंदडा यांनी जिल्ह्याला लागणारी सर्व कार्यालय येथे करुन घेतली. त्या-त्या कार्यालयांच्या इमारती तयार करुन घेतल्या आता केवळ जिल्ह्याची घोषणा बाकी आहे. ही घोषणा काही होत नसल्याने आता अंबाजोगाईकरांनी सोशल मीडियावर अंबाजोगाई जिल्हा होत नसेल तर हा तालुका लातूर जिल्ह्याला जोडण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मागणीची अंबाजोगाई तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.