अंत्ययात्रा काढून जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी बीडच्या आंदोलनाची राज्यात चर्चा!
लोकगर्जना न्यूज
एक महिला स्मशानभूमीत आंदोलन करीत आहे तर, एक आंदोलक महिलेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसुती झाली. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला.
भूसंपादनाच्या मावेजा मिळावा यासाठी सासु गेली, यानंतर पतीने कार्यालयासमोर आत्महत्या करुन जीव दिला. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. आता मागील दहा दिवसांपासून पाली ( ता. बीड ) येथील सासु,पती गमावलेली महिला त्याच मागणीसाठी जक पतीला आग्नी दिलेल्या ठिकाणी स्मशानभूमीत आंदोलन करीत आहेत. दहा दिवस झाले ती महिला स्मशानभूमीत आहे. तरीही जिल्हा प्रशासनाने आणखीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. तसेच घरकुल मिळूनही मावेजा मिळत नसल्याने ते मिळावं म्हणून एक गरोदर महिला कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली होती. दहा दिवस उलटून गेले तरी या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करणाऱ्या महिलेची प्रसुती झाली. यानंतरचा कळस म्हणजे प्रसुती होऊन ही ती महिला एक दिवसाचे बाळ घेऊन आंदोलन सुरुच ठेवले. हे प्रकार पहाता जिल्ह्यात प्रशास जिवंत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज शनिवारी ( दि. ५ ) सकाळी पाली येथे अंत्ययात्रा काढून जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी अग्नी डाग दिला. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची राज्यात चर्चा सुरू आहे.