अंजनवती येथे जिजाऊ जयंती साजरी

बीड : तालुक्यातील अंजनवती येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन राजाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी जिजाऊंच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे, शिवसेनेचे माजी सरपंच कैलास येडे, वैभव येडे, भिवाजी सोनवणे, अंकुश चाळक, कैलास जाधव, पांडुरंग येडे, दत्ता थोरात, भाऊराव येडे, लखन आमटे, सुनील फाटक, अशोकभाऊ येडे, अशोक काटवटे, श्रिकेश वारकरी, अनिल व्यवहारे, गणेश जोशी, भारत येडे, नितीन गायकवाड, पंजाब पाटील, अभिमान येडे, राजाभाऊ सोनवणे, दत्ता पार्टी, राम शिंदे, बाळूदादा येडे, मारुती वारकरी, काशिनाथ नाना,सतीष कदम, बाबुराव मुसळे सह आदी उपस्थित होते.