आपला जिल्हा
ॲट्रॉसिटी गुन्हा बाबतीत पोलीसांचे प्रशिक्षण शिबीर

केज : येथील पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना घ्यावयाची दक्षता या विषयावर पोलीसांचे प्रशिक्षण पार पडले.
सोमवारी ( दि. ७ ) सायंकाळी केज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पोलीस अधिकारी व तपासी अमंलदार यांचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गुन्हा दाखल करीत असताना घ्यावयाची प्राथमिक माहिती व गुन्हा दाखल करीत असताना घ्यावयाची दक्षता याची माहिती दिली.
प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि तपासी अमंलदार उपस्थित होते.