क्राईम
११ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दांपत्याची आत्महत्या

नेकनूर : अकरा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नव दांपत्याने आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना आज समोर आली. या मागील कारण समोर आले नसून पोलीस तपास करीत आहेत.
बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील वैतागवाडी येथील घटना असून राजेश जगदाळे ( वय २५ वर्ष ), दिपाली राजेश जगदाळे ( वय २४ वर्ष ) असे मयत पती-पत्नी आहेत. या दाम्पत्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत दिपाली या गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. संसाराची वेल वाढण्याआधीच त्यांनी आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.