हृदयद्रावक!महिनाभर मुलाच्या शोधात असलेल्या बीड जिल्ह्यातील वृध्दाचा बेळगाव मध्ये दवाखान्यात मृत्यू

बेवारस म्हणून करणारं होते अंत्यविधी; कर्नाटक व धारुर पोलीसांच्या तत्परतेमुळे कुटुंबाचा लागला शोध
लोकगर्जना न्यूज
एका वृध्दाचा बेळगाव ( कर्नाटक ) येथील दवाखान्यात निधन झाले. सोबत कोणीही नाही. त्यामुळे दवाखाना प्रशासनाने याची खबर स्थानिक पोलीसांना दिली. त्यानंतर परिसरातील सर्व कारखान्यांवर ओळख पटविण्याचा प्रयत्न केला त्यातही यश आले नाही. त्यामुळे बेवारस म्हणून अंत्यविधी करण्याचा निर्णय झाला. परंतु मृत्यू वेळी धारुर असे नाव तो सांगत असल्याचे पोलीसांना माहिती मिळाली. कर्नाटक पोलीसांना धारुर ( जि. बीड ) पोलीसांना संपर्क साधून व मयताचा फोटो पाठवून हा व्यक्ती तुमच्या हद्दीतील आहे का? सपोनि धारुर यांनी तो फोटो सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून शोध घेण्यास सांगितले. तो व्यक्ती भगवान नागु पवार असून आडस येथील असल्याची ओळख पटली. त्या मृतदेहावर आज नातेवाईकांच्या उपस्थितीत आडस येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. कर्नाटक व धारुर पोलीसांच्या तत्परतेमुळे त्या वृध्दाची मृत्यू नंतर का होईना कुटुंबाची भेट झाली. त्यामुळे नागरिकांमधून पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
प्रत्येक बापाची ईच्छा असते की, मला शेवटचा अग्नी माझ्या मुलाने द्यावे, अंत्यविधी माझ्या गावी व्हावा, पण वेळ कधी सांगून येत नाही. आडस ( ता. केज ) येथील भगवान नागु पवार यांच कर्नाटक राज्यातील सिंकेश्वर येथील येथील दवाखान्यात मृत्यू झाला. सोबत कोणीही नातेवाईक नव्हते, काही ओळखपत्र ही नाही. मृत्यू झाल्याने शोध कसा घ्यावा असा प्रश्न पडला. दवाखाना प्रशासनाने स्थानिक पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी येऊन चौकशी केली. याचा तपास केवळ मृत्यू होण्याआधी ते धारुर असे काही नाव घेत होते असे सांगितले. ऊस तोडणीसाठी आलेला असावा म्हणून कर्नाटक पोलीसांनी सर्व कारखाने व ऊसतोड मजुरांच्या टोळीवर जाऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. ओळख पटत नसल्याने शेवटी बेवारस म्हणून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचा प्रयत्न म्हणून कर्नाटक पोलीस महेबुब यांनी धारुर पोलीसांना संपर्क केला. मयत व्यक्तीचा फोटो पाठवून ओळख पटविण्याचे सांगितले अन्यथा दोन दिवसात आम्ही बेवारस मृतदेह म्हणून अंत्यविधी करणार असल्याचे सांगितले. फोटो मिळताच धारुर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय आटोळे यांनी मयताचा फोटो सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून ओळख पटविण्याचे सांगितले. यानंतर आडस येथील शेख सलमान याने येथील घिसाडी समाजाच्या अनिल पवार यास फोटो दाखवला त्यांने ओळखून हे माझे चुलते असून भगवान नागु पवार असे नाव असल्याचे सांगितले. यांचा आम्ही व त्यांच्या मुलाने खूप शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही असे म्हणाला. त्यास आडस चौकीचे तेजस ओव्हाळ यांनी सर्व हकीगत सांगितली व कर्नाटक येथील पोलीसांशी संपर्क करून दिला. ज्याला बेवारस म्हणत होते कर्नाटक व धारुर ( महाराष्ट्र ) पोलीसांच्या तत्परतेमुळे कुटुंब मिळाले. ज्या मुलाच्या प्रेमाखातर भेटण्यासाठी निघालेल्या वृध्दाला शेवटच्या क्षणी तरी अग्नी मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच नातेवाईक रात्रीच मृतदेह ताब्यात घेऊन आडस ( ता. केज ) कडे निघाले आहेत. आज शुक्रवारी भगवान नागु पवार यांच्या बेवारस म्हणून नव्हे तर स्वतः च्या गावात कुटुंबातील व्यक्ती अंत्यविधी करणार आहेत.