हिरवा कंदील दाखविलाच नाही; आष्टी पर्यंत रेल्वे धावणार…. चर्चेला लाल कंदील

लोकगर्जना न्यूज
आष्टी पर्यंत रेल्वे धावणार… यासाठी पंतप्रधान ऑनलाईन हिरवं कंदील दाखविणार अशी बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती. परंतु सांगण्यात येत असलेल्या ३ व ४ तारखेला असा कार्यक्रम झाला नाही. यामुळे आष्टी करांसह जिल्ह्यातील जनतेच्या भ्रमनिरास झाला. आष्टी पर्यंत रेल्वे धावणार ही चर्चा थांबली असून, कार्यक्रम रद्द झाल्याने लाल कंदील दाखविला अशी चर्चा सुरू झाली.
बीड जिल्ह्यातील जनतेच रेल्वे हा अस्थेचा प्रश्न आहे. परंतु हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. जिल्ह्यातील सर्वात मोठा राजकीय मुद्दा आहे. अनेकांनी या मुद्द्यावर निवडणूका जिंकल्या आहेत. रेल्वे मार्ग लवकर व्हावे म्हणून अनेक आंदोलने ही झाली आहेत. या सर्वांचं फलित म्हणून अहमदनगर-बीड-परळी या २५० कि.मी. रेल्वे मार्गाचे बरेच काम झाले आहे. अहमदनगर ते आष्टी या ६७ कि.मी. चे काम पुर्ण झाले असल्याने काही दिवसांपूर्वी या मार्गावरुन हायस्पीड रेल्वे ची चाचणीही झाली आहे. मात्र २५० कि.मी. पैकी केवळ ६७ कि.मी. चे काम पुर्ण झाल्याने बीडकरांचे स्वप्न साकार झाले असे म्हणता येत नाही. अशी अनेकांचं मत आहे. सध्याच्या कामाची गती पहाता बीडच्या जनतेला परळी पर्यंत रेल्वे येण्यासाठी बरेच दिवस वाट पहावी लागणार अशी ही चर्चा आहे. थोडं झालं पुढं खूप बाकी आहे, अशी रेल्वे मार्गाची स्थिती असतानाही मागील काही दिवसांपासून आष्टी पर्यंत पॅसेंजर गाडी धावणार, ३ किंवा ४ तारखेला देशाचे पंतप्रधान या रेल्वेला ऑनलाईन हिरवं कंदील दाखविणार अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू होती.परंतु असा कार्यक्रम झाला नाही. ते पुढे ढकलण्यात आला असे सांगितले जात आहे. परंतु याचे कारण गुलदस्त्यात आहे. पण रेल्वे सुरू होणार म्हणून खुशीत असलेल्या आष्टीच्या नागरिकांचा हिरमोड झाला.
एक आनंदाची बातमी
आज आष्टी पर्यंत धावणाऱ्या रेल्वेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. यामुळे हिरमोड झाला असला तरी केंद्राच्या अर्थ संकल्पात अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २०० कोटीची तरतूद करण्यात आली. ही आनंदाची बातमी असून यामुळे कामाला आणखी गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.