स्त्री रूग्णालयात वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी

लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : येथील लोखंडी सावरगाव शासकीय स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे व त्यांच्या महीला कर्मचारी यांनी आज महिलांचं म्हत्त्वाच सण असतानाही सेवेवर हजर राहून वटवृक्षाचे रोपण व पुजा करून वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा सण महीलांसाठी विशेष आहे. महीला यादिवशी वडाच्या झाडाची पुजा करून पतीच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करतात. लोखंडी सावरगाव येथील स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे व त्यांच्या महीला कर्मचारी यांनी या दिवशीही रूग्णसेवेला महत्त्व देऊन सेवेवर हजर राहत रूग्णालयाच्या परिसरात वटवृक्षाचे ( वडाचे ) रोपण करून वटपौर्णिमा साजरी केली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी लोखंडी सावरगाव स्त्री रूग्णालय येथील सर्व महिला डॉक्टर, नर्स इतर कर्मचारी व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे व टीमचे कर्मचारी उपस्थित होते.