लातूर-औरंगाबाद अंतर कमी होणार? आडस-धारुर-वडवणी-पाडळसिंगी रस्त्याचा प्रश्न मार्गी?
निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाकडून सहमती प्रधान

लोकगर्जना न्यूज
अनेक म्हत्वाच्या शहरांना जोडणारा व अंतर कमी करणार तसेच अनेक गावांसाठी विकासाला चालना देणारा लोखंडी सावरगाव फाटा ते आडस, धारुर, चिंचवण,वडवणी, पिंपळनेर, पाडळसिंगी या राज्य रस्ता क्रमांक २३२ कडे पाहिले जाते. परंतु मागील २५ वर्षांपासून हा रस्ता विकासापासून वंचित आहे. या रस्त्याला मिळालेली राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता ही रद्द करण्यात आली. हा रस्ता होणार की, नाही? असा प्रश्न पडला होता. आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता होणार असे दिसून येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सहमती देण्यात आली आहे.
लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी हा ८५ कि.मी. चा राज्य मार्ग २३२ आहे. हा रस्ता दळणवळणासाठी सोयीचा व हैद्राबाद, लातूर, अंबाजोगाई, औरंगाबाद, जालना, आदि शहरांना जवळ करणार आहे. लातूर, अंबाजोगाई येथून औरंगाबाद अथवा जालना येथे या मार्गे गेले तर तब्बल ३० कि.मी. चे अंतर कमी होणार आहे. या रस्त्ता राष्ट्रीय महामार्ग होणार होते तसेच राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता दिली होती. परंतु ते रद्द करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता होणार की, नाही? असा प्रश्न पडला होता. राष्ट्रीय महामार्ग होणार म्हणून राज्याने ही याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली. या भागातील जनता मागील २५ वर्षांपासून त्रास सहन करत नवीन रस्त्याची प्रतीक्षा करत आहे. अखेर याबाबत माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्ष घालून विधानसभेत याबाबतीत आवाज उठवला होता. यानंतर महाराष्ट्र शासनाने हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्याने हायब्रीड ॲन्युईटी प्रकल्पामधून वगळण्यात आलेल्या AU – ११७ व AU – १ ९ २३ या पॅकेजेसमधील कामे हाती घेणेबाबत . १) आपले क्र.जा.क्र.मुअओ / का -०७ / HAM / AU – ११७ / २ ९ ७ दिनांक २३.१.२०२२ . २) आपले क्र.जा.क्र.मुअऔ / का -०७ / HAM / AU – १२३ / २ ९९ दिनांक २३.१.२०२२ यामध्ये चालू दरसूचीवर अंदाजपत्रक करून प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत काम हाती घेण्याच्या दृष्टीने नव्याने निविदा राबविण्यास सहमती प्रदान करण्यात येत आहे . तरी हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमीत शासन निर्णय व सुचनांचे पालन करून विहित कार्यपध्दतीन्वये उचित कार्यवाही करण्यात यावी. असे पत्रात नमूद आहे. सदरील पत्र मुख्य अभियंता, सा.बां.प्रा.वि. , औरंगाबाद तसेच अधिक्षक अभियंता , सा.बां . मंडळ , उस्मानाबाद यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे आता राज्य रस्ता क्रमांक २३२ कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच हा मार्ग होऊन आडस, धारुर, चिंचवण, वडवणी, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाडळसिंगी या भागातील जनतेच रस्त्याचे स्वप्न साकार होणार असे चिन्ह दिसत आहे. परंतु यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार की, तातडीने ही प्रक्रिया पुर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.