करुणा शर्मा झाल्या बीडकर; घेतलं स्वत:च घर

लोकगर्जनान्यूज
बीड : धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा या आता बीडकर झाल्या आहेत. त्यांनी बीड येथे घर घेतले असून, यानिमित्ताने त्या बीड येथे रजिस्ट्री कार्यालयात आल्या होत्या. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांना कंबर कसण्याचा इशारा दिला.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे नाव ईआता सर्वांना परिचित झाले असून, करुणा शर्मा यांनी बीडमध्ये घर खरेदी केले. त्याच्या रजिस्ट्री साठी त्या बीड येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी रजिस्ट्री कार्यालय समोर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या यापुर्वी मी बीड जिल्ह्यात आले होते. तेंव्हा मला खोट्या केसमध्ये आडकवण्यात आले. अन् अशी मी एकटी नसून असे अनेकांना अडकविण्यात आले. काही प्लॅनिंग तर माझ्यासमोर झाल्याचा गौप्यस्फोट केला. धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली आहे आता मुंडेंनी कंबर कसावी असं म्हटलं आहे. येथे राहूनच मी घानसाफ करणार असल्याचे म्हटले आहे. बीड येथे घर घेतल्याने करुणा शर्मा बीडकर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.