अपघातामुळे केज-बीड रस्त्यावर वाहतूक ठप्प! वाहनांच्या लागल्या रांगा

केज : केज-बीड रस्त्यावर कंटेनर पोलला धडकून रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. लहान वाहने कसेबसे मार्ग काढत आहेत परंतु मोठी वाहने दोन्ही बाजूंनी उभी असल्याने कोंडी झाली असल्याचे सांगितले जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीन घेऊन लातूरला जात असलेला कंटेनर आज गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलला ( खांब ) धडकून रस्त्यावर आडवा पडला आहे. कंटेनर मोठा असल्यामुळे पुर्ण रस्ता त्याने व्यापून गेला आहे. वाहनांना पुढे जाता येत नाही. वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी झाली असून हा रस्ताच बंद पडल्याचं काहीसं चित्र निर्माण झालं आहे. लहान वाहने कसेबसे मार्ग काढत आहेत परंतु अवजड वाहने सकाळी ६ वाजल्यापासून जागेवर उभी असून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सदरील अपघात केज शहरापासून जवळच असलेल्या कदम पाटीजवळ घडला आहे.