भवताली

आडसचे मुख्याध्यापक मोरे सेवानिवृत्त

विद्यार्थ्यांनी स्वावलंबी कसं व्हावं आणि नेतृत्व गुण कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मोरे एम . पी .सर

मोरे सर यांचे पूर्ण नाव मधुकर परसराम मोरे यांचा जन्म मांडवा जि.उस्मानाबाद या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव कलावती बाई ,सरांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असा त्यांचा मोठा परिवार होता सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले मोरे सर
मोरे सरां सहित कुटुंबातील सर्वच मुले हुशार आणि कष्टाळू होती
मोरे सर यांचे प्राथमिक शिक्षण जि प प्रा शा मांडवा या गावी झाले . मोरे सर चौथीला असताना ते चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र झाले आणि त्यांना प्रतिवर्षी दीडशे रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली इथूनच त्यांच्या स्वावलंबनाची खरी सुरुवात झाली जर आजच्या विद्यार्थ्यांना लहानपणी असे पैसे मिळाले असते तर त्याचा खर्च करून ते विद्यार्थी मोकळे झाले असते पण त्याचा वापर कसा करावा हे मोरे सरांनी एक स्वावलंबनाचा धडा म्हणून एक आदर्श घडविला .मोरे सर यांनी मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून एक शेळी खरेदी केली व आपल्या गावातच एका व्यक्तीकडे ती सांभाळायला दिली मोरे सरांनी आठवड्यातून शनिवारी दुपारनंतर व रविवारी पूर्ण दिवस त्या व्यक्तीच्या सर्व शेळ्या सांभाळायच्या आणि इतर वेळेत शाळेत नियमित जाऊन अभ्यास करायचा अशा त्यांच्या स्वावलंबनाला सुरुवात झाली .
*वचनपूर्ती चा सद्गुण*
मोरे सर पाचवीला असतानाची घडलेली घटना त्यावेळी वर्गांच्या भिंती या मातीच्या असल्यामुळे त्यांना पिवळ्या रंगाचा रंग म्हणजेच मुलतानी माती देऊन भिंती रंगवण्यात यायच्या त्यासाठी शिक्षकांनी मुलांना वर्गणी गोळा करण्यासाठी सांगितले, मोरे सर पाचवीचे वर्ग प्रतिनिधी होते आणि त्यांना सर्व मुलांचे 25 पैसे प्रमाणे रक्कम गोळा करायला सांगितली . वर्गात मुलांनी 25 पैसे याप्रमाणे रक्कम दिली परंतु त्यामध्ये पाच मुले हे 25 पैसे द्यायचे राहिले त्या पाच मुलांचा मिळून सव्वा रुपया हे कमी पडत होते मोरे सरांनी स्वतः आपल्या वर्गाचा अपमान होऊ नये म्हणून आई कडून थोडी ज्वारी घेतली आणि ती दुकानी जावून विकली आणि त्यातून सव्वा रुपया मिळवला आणि ते देण्यासाठी त्यावेळची त्यांचे शिक्षक सुतार सर यांच्याकडे द्यायला गेले परंतु सुतार सर त्यावेळेस मांडवा ते मस्सा हे अंतर सायकलवर पार करून जायचे कारण त्यावेळी मांडवा ते मस्सा एसटी बसेसची सोय नव्हती आणि सुतार सरला शोधल्यानंतर ते मस्स्या कडे गेले असे कळाले परंतु यांना वाटलं की आपल्या वर्गाने जे वचन दिलं होतं त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडत आहोत म्हणून मोरे सर तो सव्वा रुपये घेऊन मस्सा या गावाकडे धावत राहिली मांडवा ते मस्सा हे अंतर जवळपास आठ किलोमीटरचे , सुतार सर पुढे गेले होते आणि मोरे सर पाठीमागून धावत होते शेवटी आठ किलो मीटर धावत जावून मोरे सर मस्सा या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी सुतार सरांची भेट झाली आणि त्यांनी मोरे सरांना बघितल्यानंतर विचारले की तू इथं का आलास त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्या वर्गाचा सव्वा रुपया कमी होता त्यामुळे मी द्यायला आलो त्यावेळेस सुतार सर त्यांना सांगितलं अरे याची काय गरज होती उद्याही दिले असते . नाही सर आपण रंग आणायला चाललात आपल्याला हे पैसे द्यायलाच पाहिजे , मोरे सरांची ही धडपड पाहून सुतार सरांनी सुद्धा त्यांच खूप कौतुक केलं त्यानंतर सुतार सरांनी त्यांना मस्सा या ठिकाणीच थांबवलं आणि कळंबला एसटीने जाऊन त्यांनी रंग आणला आणि येता वेळेस त्यांना सायकल वरून घेऊन मस्सा ते मांडवा गावी ते परत आले .
म्हणजे आपण जे वचन शिक्षकांना दिलं होतं ते आपण पूर्ण करण्यासाठी चा धडपड करण्याचा गुण हा मोरे सरांमध्ये होता .
मोरे सरांचे माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय मांडवा तर उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी झाले त्यांनी पदवीचे शिक्षण बीएससी मध्ये पूर्ण केले ते शिक्षण शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी पूर्ण केले त्यांनी चौथीत लावलेल्या रोपट्यांचा वटवृक्ष झाला होता त्या वेळच्या शिष्यवृत्ती चे गुंतवलेले दीडशे रुपये आज त्या पैशाची घेतलेली शेळी त्याच्या जवळपास 20 शेळ्या झाल्या होत्या त्यामुळे शिक्षणासाठी लागणारा पैसाही मिळत होता अशातच त्यांची बी एड साठी श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा या ठिकाणी निवड झाली त्यांनी गणित आणि विज्ञान मध्ये आपले बीएड शिक्षण पूर्ण केली
आज सुद्धा विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसे पाचवी ला शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा यातून विद्यार्थ्यांचे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळू शकते ही संधी गेली तर आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा आहेच एन एम एम एस परीक्षा सुद्धा आहे त्या परीक्षा देऊन स्वावलंबी घडू शकतात विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मोरे सर यांचे शिक्षण पूर्ण झाले आता गरज होती नोकरी शोधण्याची मोरे सर एक दिवशी मांडवा इथून निघाले नोकरी शोधण्यासाठी औरंगाबादला ,मांडवा इथून कळंब ला आले कळंब इथून केज गाडीत बसले जेव्हा गाडी साळेगाव येथे थांबली तेव्हा त्यांच्या बाजूला एक शालेय विद्यार्थिनी बसली होती ती केजला शाळेत जात होती मोरे सर यांनी त्या मुलीशी गप्पा मारत असताना ती मुलगी म्हणाली मी वसंत विद्यालय केज येथे शिकते आणि ती शाळा आडसकर साहेबांची आहे .
आडसकर साहेबांच्या भरपूर शाळा आहेत त्या शाळेविषयी चौकशी केल्यानंतर त्या मुलीने मोरे सरांना वसंत विद्यालय या शाळेत घेऊन गेली सोबत कागदपत्र होतेच सर्व कागदपत्र गुळभिले सरांनी तपासली आणि लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या परवानगी ने त्यावेळचे संस्थेचे सचिव चवार गुरुजी यांच्या कडे दिले , त्यांनी लगेचच त्यांना शिक्षक या पदावर नोकरी करता का असे विचारले मोरे सरांनी लागलीच हो भरली आणि अशा रीतीने त्यांना गणित इंग्रजी आणि विज्ञान या तिन्ही विषयांमध्ये तज्ञ असणारे मोरे सर शिक्षक म्हणून जय भवानी कन्या प्रशाला केज या ठिकाणी त्यांना शिकवण्यास पाठवले काही वर्षानंतर मोरे सर यांनी लालबहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावरगाव ,शंकर विद्यालय साळेगाव, दयानंद विद्यालय देवळा , वसंत विद्यालय केज या ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले सरांचे वैशिष्ट्य असं होतं की ते थ्री इन वन म्हणजेच तिन्ही विषय जे अवघड विद्यार्थ्यांना वाटायचे गणित , विज्ञान, इंग्रजी हे तर ते शिकवायचेच पण त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे ज्ञान आहे ते शंभर टक्के देण्याचा ते इमानदारीने प्रयत्न करत असत .
या कार्याची पावती म्हणून शिक्षण संस्थेचे सचिव मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी 2013 मध्ये वसंत विद्यालय केज या ठिकाणी उपमुख्याध्यापक या पदाची जबाबदारी दिली त्या पदाला सुद्धा मोरे सरांनी योग्य न्याय दिला .
यानंतर त्यांना आणखी महत्वाची जबाबदारी देण्यात आली दि .25 जून 2020 रोजी मोरे सर यांची श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आडस या ठिकाणी प्राचार्य पदावर नेमणूक झाली आणि नेतृत्व कसे असावे हे त्यांनी सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांना दाखवून दिले , एवढेच नाही तर वृक्ष संवर्धनाचा त्यांना पूर्वीपासूनच छंद होता आणि त्या वृक्ष संवर्धनाचे वेड त्यांना या शाळेतही गप्प बसू देत नव्हते त्यांनी अनेक रोपटे लावली नुसती लावलीच नाही तर त्याचे संवर्धन करून त्यांना वाढवले पण आज मध्यान्ह भोजन करताना विद्यार्थी त्या झाडांच्या सावलीत बसतात ते पाहून मोरे सरांचा चेहरा अगदी आनंदीत होतो
असे सर्व गुणसंपन्न हरहुन्नरी ,एव्हरग्रीन मोरे सर हे 31 जानेवारी या दिवशीच सेवा निवृत्त झाले पण त्यांचा सेवा निवृत्ती निरोप समारंभ 22 फेब्रुवारी या दिवशी करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मोरे सरांना पुढील आयुष्य निरोगी आणि आनंदी जावो या खूप खूप शुभेच्छा .
*संकलन*
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडस ता. केज जि. बीड .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »