बँडबाजा अन् बीडच्या मित्रांची राज्यभर चर्चा; कारण वाचून तुम्हीही हसाल

लोकगर्जनान्यूज
बीड : येथील रंकाळा ग्रुप सर्व परिचित असून, हा ग्रुप सामाजिक कार्यात सहभागी असतो. तसेच या ग्रुपचे सदस्य आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहेत. आरोग्य उत्तम रहावं म्हणून ते नियमित सकाळी व्यायाम करतात. शनिवारी सकाळी एक मित्र ग्राऊंडवर न आल्याने मित्रांनी नामी शक्कल लढवली अन् हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या मित्रांची राज्यभर चर्चा होत आहे. ती काय आहे नामी शक्कल तर सविस्तर बातमी वाचा.
व्यायाम अन् कंटाळा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाला व्यायामाचे महत्त्व माहीत आहे अन् व्यायाम करायचा असतो परंतु उद्या पासून. कसंबसं सुरु झाला तर कधी जागं आली नाही, रात्री जागरण झालं असे विविध कारणे सांगून दररोज एकजण तरी गायब असतो. असंच रंकाळा ग्रुपचे सदस्य दररोज सकाळी ग्राऊंडवर व्यायामासाठी येतात. जे येणार नाही त्या मित्राला सर्वांना पार्टी द्यावी लागते. पार्टी ही मित्रांची आवडती गोष्ट आहे. पण या मित्रांनी वेगळीच शक्कल लढवली. सकाळी एक मित्र ग्राऊंडवर आला नाही. मग सर्वांनी त्या मित्राच्या घरी जाण्याचे ठरवलं अन् तेही असतंस नाही तर चक्क बँड बाजा घेऊन. बँड वाल्यांना बोलावून हे मित्र वाजत गाजत त्या मित्राच्या घरी पोचले. अन् दारा समोर बँड वाजवायला सुरुवात केली. शेजारी व मित्रांच्या कुटुंबालाही काहीच समजेना… सकाळी सकाळीच बँड का वाजत आहे म्हणून सर्वांनी गर्दी केली. काही वेळाने या मागचं कारण समजल्यावर प्रत्येक जण खदखदून हसायला लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ पाहून कॉमेंट करत आपली मतं व्यक्त केली. तर काहींनी असे आरोग्याच्या बाबतीत जागरूक मित्र असतील तर शंभर वर्ष वय वाढेल असेही म्हटले आहे. काहींनी बीडकरांचा नादच खुळा असे म्हटले आहे. मित्राला व्यामाचा कंटाळा न करण्यासाठी लढविलेली शक्कल पसंत पडली असून याची जोरदार चर्चा सुरू आहे. ” दोस्त कमीने होते है” यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मित्रांना मेजवानी
व्यायाम करुन सर्व मित्र सरळ घरीच आले असल्याने मग मित्राने सर्वांना थांबवून मेजवानी दिली. यापुढे आता दांडी न मारण्याचं वचन दिलं आहे.