पाटोदा येथील शेतकऱ्यांचा महावितरणच्या विरोधात आक्रोश

रास्ता रोको आंदोलन करताच प्रशासन आले ताळ्यावर
अंबाजोगाई : विहिरीत पाणी आहे पण वीजे अभावी पिकं वाळत आहेत. वीजबिल वसुलीच्या नावाखाली कनेक्शन परस्पर तोडायची. डीपी बिघडला की शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून दुरुस्त करायची, शेतातील वीज रात्रीच्या वेळी ठेवायची, लाईनमन बद्दल सतत ची तक्रार, या प्रश्नांना त्रस्त होऊन पाटोदा येथील शेतकऱ्यांनी महावितरण च्या विरोधात आक्रोश करीत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी महावितरण प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आंदोलनाची तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन महावितरण च्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रोश करीत अधिकाऱ्यांसमोर वीजेच्या प्रश्नांचा पाढा वाचला . यावेळी महावितरण प्रशासनाला उत्तर देताना भंबेरी उडाल्याचे दिसून आले. या आंदोलनात महावितरणकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महावितरण चे उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय देशपांडे, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मोरे तलाठी संजय हिबाने यांच्यासह पाटोदा सरपंच बाळासाहेब देशमुख, बळीराम सरवदे, बाबू पठाण, उपसरपंच गोविंद जामदार, मारुती सरवदे, अविनाश उगले, संभाजी घोरपडे, जलील मणियार, धनराज पन्हाळे, विजयकुमार देशमुख, हरिभाऊ सरवदे, रमेश स्वामी, किसन उगले, आकाश देशमुख, चंद्रकांत सरवदे , महेंद्र हौसेकर, अमोल देशमुख, विठ्ठल जामदार, सुभाष आबा उगले, वाजीत पठाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते