क्राईम
अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार ८ जखमी

अंबाजोगाई : अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर सायगाव जवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून यात ६ जण ठार तर ८जन जखमी झाल्याची सांगितले जात आहे.सदरील घटना आज सकाळी घडली आहे.
अपघात ग्रस्तांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं पसरल्याने घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात इतका भीषण होता की, क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजुला काढावी लागली.