Beed- साडेबारा लाख उकळून दोघांची अज्ञात भामट्यांकडून ऑनलाईन फसवणूक

लोकगर्जनान्यूज
बीड : एकास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून १२ लाख रुपये तर दुसऱ्याला एसबीआयचे कार्ड बंद झाल्याचे सांगून ४८ हजार परस्पर खात्यातून वळवून घेतले असल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक वृत्त असे की, बदरोद्दीन खाजा मोईनोद्दीन ( वय ५३ वर्ष ) रा. सहारा कॉलणी,बीड असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन ब्लॉक ट्रेडिंग करण्यासाठी मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. यामाध्यमातून गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १२ लाख १६ हजार ८१ रु. ऑनलाईन पद्धतीने जमा करुन घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी बदरोद्दीन खाजा मोईनोद्दीन यांच्या फिर्यादीवरून ऐबीएन अमोरा कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच प्रतिमा अनिरुद्ध मोरे रा. भक्ती कंट्रक्शन यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमचे एसबीआयचे क्रेडिट कार्ड बंद पडले आहे. सुरू करण्यासाठी ओटीपी विचारुन घेऊन ऑनलाईन पद्धतीने ४८ हजार ३५७ रु. काढून फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास बीड सायबर पोलीस करत आहेत.