
लोकगर्जनान्यूज
बीड : शेतीच्या वादातून दाखल एनसी निकाली काढण्यासाठी वडवणी ठाण्यातील पोलीसांने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली. 10 हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) ने रंगेहाथ पकडले आहे. सदरील कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने केली.
समजलेली अधिक माहिती अशी की, शिक्षक व त्यांच्या भावाचे शेतातील शेजाऱ्या सोबत वाद झाला. यानंतर त्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून वडवणी पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात अदखलपात्र गुन्हा ( NC ) दाखल झाला. ही एनसी निकाली काढण्यासाठी लाचखोर पोलीस रेवणनाथ गंगावणे याने 50 हजार लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) यांच्याकडे तक्रार केली. तक्रार येताच वडवणी येथे सापळा लावण्यात आला. यावेळी 10 हजार रुपये. लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.