
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : काल रविवारी बुडालेले डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा अद्याप मृतदेह सापडला नसतात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली. एनडीआरएफ ( बचाव ) पथकातील एक कर्मचारी बुडाला असून त्यांचा ही शोध सुरू आहे. घटनास्थळी उपजिल्हाधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले सह पोलीस तळ ठोकून आहेत. मासे मारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात जवान अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेले होते. ते रविवारी ( दि. १८ ) पाण्यात बुडाले असून त्यांचा मागील २४ तासांपासून बीड, परळी येथील बचाव पथक शोध घेत आहेत. परंतु अद्याप त्यांना शोधण्यात यश आले नाही. आज शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील पथक पाचारण करण्यात आले. सकाळी या पथकाने धरणात उतरून आपलं काम सुरू केले. या दरम्यान धरणात मासे मारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात कोल्हापूर येथील दोन जवान अडकले त्यातील शुभम काटकर यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु राजु मोरे या जवानाला जाळ्यातून ओढून काढताना त्यांचा ऑक्सिजन सिलिंडर निघून वर आला परंतु मोरे बुडाले आहेत. त्यांचाही शोध सध्या घेण्यात येत आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.