भाऊसाहेब पाटील बी एड महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी

केज : येथील भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती,कृषि दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ जे. के. जाधव उपस्थित होते. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचे ज्ञान असलेल्या प्रत्येक व्यक्तीने शेतीकडे अधिकचं लक्ष दिलं पाहिजे असे मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले.
छात्रअध्यापक नितीन केदार,मदन लाड,अर्चना चव्हाण, कोमल येळवे ,आकाश ठोंबरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा शेख.आय.आर,प्रा. श्रीमती यु. बी. बलाढये,प्रा. कचरे जे.एस, ग्रंथपाल आर. डी. रितापुरे,लिपिक एस. पी. नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन कोमल येळे यांनी तर आभार केदार यांनी मानले.