पुन्हा धारुर-तेलगाव रस्त्यावर एसटी दुचाकीचा अपघात;एक ठार एक जखमी

लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : सकाळीच अंबाजोगाई-केज रस्त्यावर शिवशाही दुचाकी अपघातात झाला. यामध्ये एकजण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच धारुर-तेलगाव रस्त्यावर आज दुपारी गांवदरा जवळ एसटी दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये पोलीस पाटील जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे.
बीड जिल्ह्यातील वाढत्या अपघातांनी वाहन धारकांची झोप उडविली असून, दोन दिवस असे जात नाही की, अपघात घडला नाही. आज शुक्रवारी ( दि. १३ ) जिल्ह्यात दोन अपघात घडले आहेत. पहिला अपघात अंबाजोगाई-केज रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्राजवळ घडला आहे. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला. दुसरी घटना दुपारी धारुर-तेलगाव रस्त्यावर घडली आहे. एसटीची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दुचाकीवरील गांवदरा ( ता. धारुर ) येथील पोलीस पाटील बापूराव राघोबा बडे हे ठार झाले. रस्त्याच्या बाजूला उभे असलेले लालासाहेब बडे हे जखमी झाले आहेत. आज शुक्रवार दिवसातील दुसरा अपघात ठरला आहे.