51 लाखांच्या रोडरॉबरीचा बीड स्था.गु.शा. LCB ने लावला 10 दिवसात छडा; आरोपी केज, धारुर तालुक्यातील
टोळीतील 6 आरोपी जेरबंद एक फरार

लोकगर्जनान्यूज
बीड : विकलेल्या कापसाचे 51 लाख रुपये घेऊन येताना व्यापाऱ्यास वडवणी जवळ अडवून मारहाण करुन लुटल्याची घटना ( दि. 7 ) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ( LCB ) तपास सुरू केला. या टोळीचा छडा लावून सहा आरोपी जेरबंद केले असून एक फरार आहे. चोरलेले 51 लाख रोकड अन् गुन्ह्यात वापरलेली कार,दुचाकी जप्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामसुंदर आण्णासाहेब लांडे रा. घाटसावळी ( ता. बीड ) हे कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 760 क्विंटल खरेदी केलेला कापूस शामसुंदर लांडे यांनी केज येथील माऊली जिनिंग येथे विक्री केला. या कापसाची रक्कम 51 लाख रुपये घेऊन ते दुचाकीवरून धारुर,चिंचवण,वडवणी मार्गे घाटसावळीकडे येत होते. दरम्यान ते वडवणी जवळील खडी क्रेशर जवळ आले असता पाठीमागून एका दुचाकीवरून दोघे तोंड बांधून आले अन् लांडे यांच्या दुचाकी आडवली. काही क्षणातच स्विफ्ट कार आली. त्यातूनही तोंड बांधलेले तिघे जण व्यापाऱ्याच्या दुचाकीजवळ आले. याच जणांनी ववयापाऱ्यास लाकडी दांड्याने मारहाण करुन व्यापाऱ्याजवळील रक्कम असलेली सॅक अन् दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली गोणी घेऊन वडवणीच्या दिशेने लंपास झाले. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात शामसुंदर लांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती मिळताच स्था.गु.शाखा Beed LCB पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास सुरू केला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी केज, धारुर, तेलगाव, दिंद्रुड, सिरसाळा,आडस परिसर पिंजून काढला. तपास करत असतानाच हा गुन्हा बालाजी महादेव पुरी मैंद ता. केज याने केल्याची गुप्त माहिती मिळाली. यातील तीन आरोपी आडस रोड परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच बीड एलसीबीने जुना आडस रोड परिसरात सापळा लावून 03 इसम नामे 1) शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे वय 21 रा. गोपाळपुर ता.धारुर, 2) बालाजी रामेश्वर मैद वय 20 वर्ष रा.मैदवाडी, ता.धारुर, 3) गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर वय 33 वर्षे रा.बाराभाई गल्ली, केज यांना ताब्यात घेवून त्यांना विश्चासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदर लुटीचा गुन्हा हा माऊली जिनींग मधील मार्केट कमिटीचा कामगार 4) सुर्यकांत लक्ष्मण जाधव रा. केज याचे मदतीने 5) करण विलास हजारे वय 20 वर्षे रा.केज, 6) बालाजी रामेश्वर मैंद वय 20 रा.गोपाळपुरा, 7) संदिप वायबसे (फरार) यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. यातील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. सदरील कामगिरी नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री. धिरजकुमार बच्चु सहा.पोलीस अधीक्षक माजलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संतोष साबळे, पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे, पोह/कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, पोह/ रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, पोशि/बप्पा घोडके, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, पोह/रविंद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी केली.
जिनिंगचा कर्मचारी सामिल
टोळी प्रमुख बालाजी पुरी याच्या प्लॅनने हा दरोडा टाकण्यात आला. यामध्ये जिनिंग मधील कर्मचारी सहभागी असून व्यापारी येथून रोकड घेऊन निघताच त्यांने माहिती दिली अन् दरोड्याचा प्लॅन सक्सेस झाला.