शिवजयंती निमित्त खोडस येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

आडस : धारुर तालुक्यातील खोडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे डॉल्बी लावणं, मिरवणूक काढणे असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु यात बदल होताना दिसत असून जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. खोडस येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज मंगळवारी ( दि. २२ ) शालेय साहित्याचे वाटप करुन आदर्श असी शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच यावेळी प्रा.सुर्यनारायण यादव यांचे व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. ईश्वर मुंडे, माधव निर्मळ यांच्या सह अविनाश उगले, नितीन ठाकूर, नितीन शिनगारे,भागवत दराडे,भगवान पाटोळे,दत्ता गोन्ने,गणेश सावंत यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिकांसह अजय कोकाटे व तरुणांनी परिश्रम घेतले.