शिक्षण संस्कृती

सागर ठाकुर यांना पीएचडी ( phd of management ) पदवी

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथील सागरसिंह किशनसिंह पवार ( ठाकुर ) यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच असलेली पदवी व्यवस्थापन शास्त्र ( phd of management ) या विषयात, दि. १९ जुन २०२३ रोजी छ. संभाजीनगर येथे झालेल्या पी.एच.डी. व्हायवा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अवॉर्ड करण्याचे जाहीर केले. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याने सागर ठाकुर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक व वडील आणि बंधुना दिले.

प्रा. अभिजीत शेळके, छ. संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली “मार्केटिंग इनोव्हेशन इम्पलेमेंटेशन – अ केस स्टडी ऑफ इंडियन फार्मास्युटिकल कंपनी (सिप्ला लिमिटेड) या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. सागर ठाकुर यांनी १३ वर्ष फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट व ब्रँड मॅनेजमेंट विभागात कार्य केले असून, त्यांनी १३ हुन अधिक मेडिसिन प्रॉडक्ट्स आपल्या भारतात व युरोप, आफ्रिका व आशियाई खंडातील देशांमध्ये लॉन्च केले आहेत.
यापूर्वी बी.एससी., एम.एससी. व एम.बी.ए. चे पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय – भारत सरकार, केंद्रीय दक्षता आयोग – भारत सरकार, यू. के. पार्लिमेंट, जागतिक आरोग्य संघटना (WHO), ब्रिटिश कॉऊंसिल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी – इंग्लंड, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, नाण्यांग युनिव्हर्सिटी – सिंगापोर, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, किंग्सटन युनिव्हर्सिटी – लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम – चीन, लेडन युनिव्हर्सिटी – नेदरलँड, युनिव्हर्सिटी ऑफ केपटाउन, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न क्वीन्सलँड – ऑस्ट्रेलिया, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नुट्रीशन (ICMR-NIN), राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशासन संस्थान (NIEPA) अश्या नामांकित राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्थां मधून महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, तरुणांना प्रोत्साहन, उच्च शिक्षण, शैक्षणिक नेतृत्व सक्षमीकरण, शिक्षणात लैंगिक समानता, उद्यमशीलता आणि एन.जी.ओ. व्यवस्थापन अश्या वैविध्यपूर्ण व विभिन्न क्षेत्रात डॉ. सागरसिंह पवार यांना ८४ हुन अधिक प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत.
( phd of management ) व्यवस्थापन शास्त्र यामध्ये पी.एच.डी. केली. या संशोधनकार्यासाठी पूर्व संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. राजेंद्र उढाण, प्रा. डॉ. एस यु सूर्यवंशी यांनी केले. वडील किशनसिंह पवार, भाऊ सचिनसिंह पवार व मोनोजसिंह बंजरदार त्याचबरोबर प्रा. डॉ. मनोज बनस्वाल, प्रा. डॉ. मोहनीश महामुने, कैलास पटणे, सुधीर सोनटक्के, डॉ. किशोर माने व भागवत जाधव यांनी सतत या कार्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिले. या यशाबद्दल डॉ. सागर ठाकुर यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मंगळवारी दीक्षांत समारंभ
येत्या २७ जुन २०२३ रोजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. रमेश बैस, डॉ. बा. आं. म. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद येवले आणि भारतीय विद्यापीठ संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. पंकज मित्तल यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »