सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळावा

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी पालक मेळावा व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आरे यांनी केले. यानंतर दहीहंडी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी बसवलेल्या गाण्यावर सामूहिक गाण्यासोबत नृत्य करुन दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाला रेणुका शेळके, संगीता शिरसट, शितल खांडे, कोमल सातपुते, सिंधू चाळक, सुवर्णा सातपुते, रुपाली वाघे, स्वाती राऊत, आशालता तांगडे, अनिता कोरडे, रत्नमाला पवार, सारिका गणगे, गोकर्णा गणगे, अयोध्या खांडे, मंदाकिनी तोगे, अश्विनी आंधळे, शितल तोगे, वैशाली तोगे , शेख आसमा, शेख सुमैया, रामेश्वर जाधव, रामेश्वर राऊत, बाबुराव नरवडे सह पालक व महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष रामेश्वर सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सी.बी.चव्हाण, संतोष नागरगोजे, जिवन नागरगोजे, शितल सातपुते, नम्रता आठवले, ज्योती नरवडे, सीमा पेंढारे, मनिषा राऊत, हनुमान खांडे, दत्ता भाऊ गौंड, निलेश वंजारे यांनी परिश्रम घेतले.