गेवराई डिबी पथकाने दुचाकी चोरांच्या मुस्क्या आवळल्या दोन आरोपीकडून सात दुचाकी हस्तगत

गेवराई : वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलीस दुचाकी चोरांच्या मागावर आहेत. या चोरांना पकडण्यात गेवराई डिबी पथकाला यश आले. दोन आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या पाच बुलेट व इतर दोन दुचाकी असे एकूण सात गाड्या हस्तगत केली. हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून मोक्का अंतर्गत कारवाई झाली असल्याचे सांगितले जात आहे.
बीड जिल्ह्यात दुचाकी चोरी झाली नाही असा कदाचित एकही दिवस जात नसेल, वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना रोखणं पोलीसांसमोर मोठ आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारून बीड पोलीस दुचाकी चोरांच्या मागावर आहेत. दुचाकी चोरांचा शोध घेत असताना गेवराई पोलीस ठाणे डिबी पथकाला चांगले यश आले असून, मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असता पाच बुलेटसह इतर दोन दुचाकी असे सात गाड्या मिळून आल्या आहेत. त्यात एक काळी विना नंबर रॉयल इनफिल्ड एक बुलेट , दुसरीही एम. एच. १२ एन . ९ ८८८ नंबरची , गन मेटल रंगाची एम . एच . १७ सी.के. ११ ९९ , काळी एम . एच . १७ बीके ७३८४ , राखाडी रंगाची एम . एच . २० ईएम ७ ९ ७० या पाच बुलेट तर, एक लाल रंगाची बजाज पल्सर एम . एच . १८ बी . क्यु . ७८८१ व हिरो एचएफ डिलक्स कंपनीची एम . एच . २१ बीएन ६७५१ अशा सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर, आरोपी सोमनाथ रामदास खटाले ( वय २८ रा . खटालेवाडी ता . आष्टी जि . बीड ), संदिप दिलीप कदम ( वय २७ रा . डोंगरगाव ता . जि . अहमदनगर ) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . दोन्ही आरोपीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले . ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार , उपाधीक्षक स्वप्नील राठोड , स्थानिक गुन्हे शाखेचे सतिष वाघ , गेवराईचे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साबळे यांच्या पथकाने केली.