आपला जिल्हा
शोभेची दारू बनविण्यात येणाऱ्या कारखान्यात स्फोट:केज तालुक्यातील घटना

केज : तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील शोभेची दारू बनविण्यात येणाऱ्या कारखान्यात आज सोमवारी ( दि. २७ ) स्फोट झाला. हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. घटनास्थळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.