केज येथे पोलीसांचे पथसंचलन

केज : येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कुणी आगळीक केल्यास अशा असामाजिक घटका विरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे संकेत दर्शवण्यासाठी केज पोलिसांनी राज्य राखीव दलाचे जवान आणि गृह रक्षक दलासह शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन केले.
रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरिक्षक वैभव सारंग आणि गृहरक्षक दलाचे समादेशक दिनकर राऊत यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान, गृह रक्षक दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या केज शहरातील प्रमुख मार्गावरून शस्त्र आणि लाठ्यासह पथ संचलन केले.