शेतकऱ्यांसाठी म्हत्वाचे:शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ तारखेच्या आत करा हे काम

लोकगर्जना न्यूज
केज : पीक विमा असेल अथवा कृषी योजनेचा कोणताही लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत आपल्या पीकांचे ई-पीक पाहाणी करणे आवश्यक आहे.
शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहाणी ॲपवरून ऑनलाईन करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक ऑनलाईन पद्धतीने आपल्या ७/१२ वर नोंद असेल त्याच शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, पीक कर्ज सह आदि शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत जनजागृती सुरू आहे. ई-पीक पाहाणीची १५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे केवळ ८ दिवस आहेत. ई-पीक पाहाणी पासून एकही शेतकरी वंचित राहाणारं यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी १५ तारखेच्या आत पीक पाहणी करून आपला ७/१२ अद्यावत करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रमाणे करा ई-पीक पाहाणी