शिक्षकावर आणखी एक शिक्का वाढणार…तो काय? येथे वाचा

लोकगर्जनान्यूज
वडवणी : खाजगी सावकारकीच्या तक्रारीवरून एआर अधिकारी व पोलीसांनी एका शिक्षकाच्या घरी मंगळवारी ( दि. २७ ) छापा मारला असतात यामध्ये संशयित कागदपत्रे हाती लागल्याचे वृत्त असून, या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामुळे शिक्षकावर आता खाजगी सावकारकीचा शिक्का बसणार असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
चिंचवण ( ता. वडवणी ) येथील रमेश अंबादास बडे यांनी एका शिक्षकाच्या विरोधात खाजगी सावकारकी करत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सहायक निबंधक सहकार कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांनी शिक्षक कॉलनी येथील सदरील शिक्षकाच्या घरी छापा मारला आहे. यावेळी खाजगी सावकारकी संबंधित संशयित कागदपत्रे मिळाली असून ती अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. यासंबंधी शिक्षकाला ३० तारखेपर्यंत आपलं मत मांडण्याची मुदत दिली आहे. बिअर बार, मटक्याची बुक्की, पत्याचे क्लब येथे सर्वाधिक शिक्षक असतात अशी नेहमी उघड चर्चा असते. या बोटांवर मोजण्या इतक्या शिक्षकांना पाहून त्याच नजरेने प्रत्येकाकडे पहाण्यात येत असून नाही तसा शिक्काच लोकांनी मारला आहे. खाजगी सावकारकीचा प्रकार समोर आल्याने तो अद्याप सिद्ध होणं बाकी असले तरी गुरुजी तुम्ही सुद्धा म्हणत हे खाजगी सावकारकीचा शिक्का बसणार? अशी चिन्हे दिसत असून जिल्हाभरात अनेक शिक्षक खाजगी सावकारकी करतात अशी चर्चा आहे.