आपला जिल्हाराजकारण

विखे पाटील कारखाना बिनविरोध; खा.रजनीताई पाटील यांचे वर्चस्व कायम !

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा डॉ.पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली यामध्ये खा.रजनीताई पाटील यांनी कारखान्यावर पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम पार पडला दि.१६ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४१ अर्जापैकी केवळ २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यामध्ये संस्था मतदार संघातून पाटील तिलोत्तमा अमरसिंह, केज गटातून भंसाळी प्रकाश जगन्नाथ, मुळे दत्तात्रय सुंदरराव, निबाळकर श्रीरंग ज्ञानोबा, नांदूर गटातून जाधव युवराज रामराव, देशमुख कृष्णराव अच्युतराव, इतापे नामदेव वैजेनाथ, युसुफवडगाव मतदार संघातून पवार शहाजी भिमराव, साखरे धोंडीराम शहाजी, इखे राम अप्पासाहेब, सारणी (आ) गटातून साखरे भाऊसाहेब दादासाहेब, इंगळे रवि ज्ञानोबा, सोनवणे रविकांत पुरुषोत्तम, लहुरी गटातून चाळक दत्तात्रय रामनाथ, कुलकर्णी सुभाष प्रल्हाद, थोटे नवनाथ रामनाथ, अनुसूचित जाती भालेराव नारायण ज्ञानोबा, महिला गटातून मेटे वैशाली प्रविण, आंधळे उर्मिला दिनकर, इतर मागास प्रवर्गातून राऊत अनिल नामदेव, विमुक्त जाती प्रवर्गातून डोईफोडे बन्सी एकनाथ यांची बिनविरोध निवड झाली असून या सर्व नवनिर्वाचित संचालकांचे खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, सुरेश पाटील, अप्पासाहेब ईखे आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »