
लोकगर्जना न्यूज
बीड : जिल्ह्यातील केज शहरातून दोन महिला व तीन मुलं गायब असल्याची घटना कुटुंबियांनी पोलीसात हरवल्याची तक्रार दिली आहे. २० दिवसात दोन घटना उघडकीस आल्याने नेमका हा प्रकार काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. अपहरणाचा तर प्रकार नाही ना याबाबत नागरिक तर्क लावत असून या घटनेने मात्र शहरात खळबळ माजली आहे.
अंकिता दिपक ढाकणे रा. फुले नगर ( केज ) ही महिला आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह स्कुटी घेऊन घरा बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी शोध घेतला परंतु मिळून न आल्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. सदरील महिला १५ ऑगस्ट पासून गायब आहे. तर २५ जुलैला ही अनिता युवराज कांबळे रा. शिक्षक कॉलनी ( केज ) ही महिला आपल्या एक मुलगा व मुलगी असे दोन लेकरांसह २५ जुलै पासून गायब आहेत. याप्रकरणी पोलीसात कुटुंबियांनी तक्रार केली आहे. २० दिवसात शहरात मिसींगच्या दोन घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे. हा अपहरणाचा प्रकार आहे की, इतर काही याबाबत केज पोलीस कसून तपास करत आहेत. तपासातून हा प्रकार नेमका काय? स्पष्ट होईल. त्यामुळे केज शहरातील नागरिकांचे लक्ष तपासाकडे लागले आहे.