अंबाजोगाईत फौजदारावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल

अंबाजोगाई : आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी अंबाजोगाई येथे कार्यरत असलेल्या फौजदाराने ५० हजार रू. लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४० हजार देण्याचे ठरले. याबाबत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून त्यांनी शहानिशा करून ४० हजार रुपये लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपाळ दिगंबर सुर्यवंशी ( पोलीस उपनिरीक्षक अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे ) असे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झालेल्या फौजदाराचे नावं आहे. यानी तक्रारदार व त्यांच्या मित्राला एका गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा बीडला न करता येथेच अंबाजोगाई तहसील मध्ये करुन देतो असे सांगून ५० हजार रु. लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४० हजार देण्याचे ठरले. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार केली. लाच स्विकारण्याचे मान्य केले म्हणून आज दुपारी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गोपाळ सुर्यवंशीवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक बीड विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अमंलदार सुरेश सांगळे,श्रीराम गिराम, हनुमान गोरे,अमोल खरसाडे, अविनाश गवळी,चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.