लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अंबाजोगाई : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता ३० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ही बातमी शहरात पसरताच एकच खळबळ माजली असून, कार्यालयातच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
एका गुत्तेदाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या विकासकामांचे बील प्रलंबित आहे. ते बील काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याने लाच मागतली. याप्रकरणी सदरील गुत्तेदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज बुधवारी ( दि. २२ ) सापळा रचला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ३० हजारांची लाच स्वीकारताना कोकणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही बातमी अंबाजोगाई शहरात वाऱ्यासारखी पसरली असल्याने एकच खळबळ माजली आहे. संजयकुमार कोकणे हे आल्यापासून वादग्रस्त ठरलेले असून, यापुर्वीही त्यांचे पिस्तूल व जिल्हाधिकारी यांना लिहिलं पत्र प्रकरण चांगलेच गाजले आहे.