Beed News- Dial 112-वर एक कॉल अन् पोलीसांची धावपळ; मिशन पुर्ण झाल्याचा आनंद

लोकगर्जनान्यूज
बीड : चार वर्षांच्या मुलासह बापाने बिंदुसरा धरणात उडी घेतली. महामार्गावरून एका प्रवाशाने पाहून पोलीस मदतीसाठी 112 Dial क्रमांकावर फोन करुन माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. काही क्षणातच घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाप-लेकांचे प्राण वाचवले.मिशन फत्ते होताच सर्व क्रमचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ही बातमी समजताच प्रत्येकजण वेल्डण ( well done ) बीड पोलीस म्हणत कौतुक करत आहे. सदर कामगिरी बीड ग्रामीण पोलीसांनी केली आहे.
शनिवार ( दि. 10 ) दुपारी साडेतीनच्या सुमारास खूप उन असल्याने प्रत्येकजण सावलीत बसलेला होता. याच वेळी संकटकाळी पोलिसांची मदत मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टोल फ्री क्रमांक 112 दिलेलं आहे. या क्रमांकावर फोन आला. त्या व्यक्तीने बिंदुसरा धरणात एका व्यक्तीने लहान मुलासह उडी घेतल्याची माहिती दिली. हा भाग बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत येतो त्यामुळे ग्रामीण ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणखांब, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस हवालदार मोराळे, पोलीस हवालदार आनंद मस्के, अभिमान जायभाय यांनी घटनास्थळी धाव घेतली. बार्शी नाका ते बिंदुसरा धरण हे अंतर अवघ्या 7 मिनिटांत सर करून, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे धावत धरणात उड्या घेत बाप लेकाला पाण्यातून बाहेर काढले. दोन्ही बाप लेक सुखरुप असून, दोघांचे प्राण वाचले अन् मिशन फत्ते झाल्याचा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ही बातमी समजताच प्रत्येकजण वेल्डण बीड पोलीस म्हणत बीड ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत.
बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याचे कृत्य
सदरील तरुण हा बीड शहरातील असून बाहेर काढून तो शांत झाल्यानंतर विचारपूस केली असता बायकोच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. बीड ग्रामीण पोलिसांच्या तत्परते मुळे दोन जीव वाचले आहेत.