रात्री आडसमध्ये कपड्यांची दुकान फोडली पद्धत जुनीच चोरी नवीन’

आडस : येथील धारुर रस्त्यावरील बालाजी कलेक्शनचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले. यामध्ये नेमकं काय व किती सामान चोरीला गेला हे पोलीस आल्यानंतर समजणार आहे. तसेच रात्री पार्टी येणार असल्यानं दुकानात रोख रक्कम ही होती. या घटनेनंतर ‘पध्दत जुनीच चोरी नवीन’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक चार, सहा महिन्याला आडस येथे चोरीच्या घटना घडतात. परंतु याचा तपास काही लागत नाही त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असल्याचे दिसून येत आहे. या घटना नियमित आहेत. शुक्रवारी ( दि. २५ ) मध्ये रात्री धारुर रस्त्यावरील बालाजी कलेक्शनचे हे कपड्यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलं आहे. पद्धत जुनीच असून, दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये चोरटे घुसले व त्यांनी चोरी केली. एका वृद्धांच्या सांगितले की, पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास चौघे दुकान उघडत होते परंतु संशय न आल्याने त्यांना हटकले नाही. हे दुकान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर आहे. तरीही ते फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नियमित चोरीच्या घटना घडूनही एकाही घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही. तसेच मोठ्या बाजारपेठेचे गाव असून ही येथे केवळ दोन पोलीस कर्मचारी तेही दिवसाचं असतात रात्रीची गस्त बंद असल्याने त्यामुळे चोरट्यांना मोकळं रान मिळतं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.